न्यू इअर सेलिब्रेशनसाठी गेट वे गाठायचा प्लान? थांबा...

2016 या वर्ष अखेरची शेवटी रात्र गेट वे ऑफ इंडिया इथे साजरी करण्याचा तुमचा विचार असेल तर तिथे जाऊन काहीच फायदा होणार नाही.

Updated: Dec 31, 2016, 05:09 PM IST
न्यू इअर सेलिब्रेशनसाठी गेट वे गाठायचा प्लान? थांबा...  title=

मुंबई : 2016 या वर्ष अखेरची शेवटी रात्र गेट वे ऑफ इंडिया इथे साजरी करण्याचा तुमचा विचार असेल तर तिथे जाऊन काहीच फायदा होणार नाही.

कारण, मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया परिसरात, रात्री १० नंतर प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या तीन वर्षांप्रमाणेच मुंबई पोलिसांनी याही वर्षी रात्री १० नंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात प्रवेश बंदी केली आहे. 

तर गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्ह या दोन्ही भागात काही निवडक ठिकाणीच आतिषबाजी करु दिली जाणार आहे. मात्र, आगीच्या दुर्घटना टाळण्याकरता, हवेत कंदील सोडायला सक्त मनाई करण्यात आलीय.

दरम्यान, मावळतीच्या सूर्याच्या साक्षीनं गत आठवणींना उजाळा देत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मुंबईतल्या समुद्रकिनारी अनेकांनी गर्दी केली आहे.