...पण, खाजगी क्लासेसवर कारवाई करणार कशी?

खाजगी क्लासेसवर कारवाई करण्याचा कुठलाच कायदा सरकारकडे नाही, अशी कबुलीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलीय. 

Updated: Jul 22, 2015, 08:39 PM IST
...पण, खाजगी क्लासेसवर कारवाई करणार कशी? title=

मुंबई : खाजगी क्लासेसवर कारवाई करण्याचा कुठलाच कायदा सरकारकडे नाही, अशी कबुलीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलीय. 

इतकंच नाही, तर महाविद्यालयांसोबत हातमिळवणी करून क्लासेस चालवले जातात. त्यामुळे, कॉलेजमध्ये न जाता विद्यार्थी फक्त क्लासला हजेरी लावतात, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

खाजगी क्लासेसच्या शिक्षणाचा दर्जा लक्षात घेता क्लासमध्ये विद्यार्थी ऐवजी केवळ 'परीक्षार्थी' घडतोय... क्लासचं स्तोम दिवसेंदिवस वाढत चाललंय, पण शिक्षणाचा दर्जा मात्र घसरत चाललाय, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. 
  
क्लासला कुठलेही नियम नाहीत, पायाभूत सुविधांचाही अभाव असतो. यासंदर्भात सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.