शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार

शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.

Updated: Jul 22, 2015, 02:03 PM IST
शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार title=

मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.

शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने २०११-१२ या वर्षात, १४ लाख ५७ हजार शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने जादा बिलवसुली झाली आहे. राज्य सरकारने यासाठी चौकशी समिती देखील नेमली आहे. या चौकशीसाठी समितीचा अहवाल डिसेंबरपर्यंत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

शेती पंपाचं जादा बिल वसुली हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील एक मोठं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी विधानसभेत तत्कालीन आघाडी सरकारवर याविषयी आरोप केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.