मुंबई : फेसबुकवर प्रतिक्रिया देतांना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण फेसबुकवर अपशब्द लिहून कमेंट केल्याने, एका तरूणीने आपलं आयुष्य संपवलं आहे.
अशाच एका प्रतिक्रियेमुळे तरूणीच्या भावना दुखावल्या, ती अत्यंत नाराज झाली, आणि तिने नैराश्यात आत्महत्या केल्याची सध्या चर्चा आहे.
फेसबुकवरील प्रतिक्रियमुळे एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे.
मीरारोडवर राहणाऱ्या युवतीच्या फेसबुक अकाऊंटवर प्रोफाईल फोटोखाली एका तरूणाने अपशब्द लिहला.
हा शब्द दिला सहन झाला नाही आणि तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. ही मुलगी दहावीत शिकत होती.
मुलीच्या फेसबुक फोटोवर अपशब्द लिहल्याच्या आरोपाखाली 19 वर्षाच्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. या तरूणाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तरूणामुळे या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
हा तरूण अनेक वेळा या मुलीला त्रास देत होता. पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती, पण पोलिसांनी कोणतीही केली नाही, असा आरोप या युवतीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.