मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडलीये. या प्रकरणातील महत्वाचा आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केलीये.
त्यामुळे शीना बोरा हत्या प्रकरणातील आतापर्यंत समोर न आलेल्या गोष्टी समोर येतील अशी चर्चा सुरु झालीये.
श्यामवर राय याने आज न्यायालयात हजर राहून माफीचा साक्षीदार बनवण्याची न्यायालयाला विनंती करत अर्ज केलाय. श्यामवर रायच्या या अर्जावर सीबीआय १७ मे रोजी आपले म्हणणे न्यायालयात सांगणार आहे.