डान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली

डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे. 

Updated: Dec 6, 2015, 08:43 PM IST
डान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली title=

मुंबई : डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे. 

नव्या नियमावलीत म्हटलं आहे, प्रत्येक डान्सबारमध्ये सीसीटीव्ही असावा, बारबालांवर पैसा उधळण्याची परवानगी नाही, तसेच बारबालांपासून सुरक्षित म्हणजेच पाच फूट अंतर ठेवावं. बारबालांना मद्य प्राशान करून डान्स करण्याची परवानगी नाही. एकंदरीत बारबालांना मद्यपान करण्याची परवानगी नाही.

ही नियमावली सरकारने अतिशय हुशारीने मांडली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण ज्या कारणांसाठी बारमालकांनी सुप्रिम कोर्टापर्यंत खेटे मारले तेच मुद्दे दुसऱ्या पद्धतीने नव्याने मांडण्यात आले आहेत, एकंदरीत छमछम तशी बंदच राहणार असल्याचं दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.