...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार?

देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 9, 2015, 11:21 AM IST
...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार? title=

नवी मुंबई : देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.

महासभेत पशासनाने स्मार्ट सिटीला पाठिंबा देण्यासाठी आणलेल्या प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादीने नामंजूर केला आहे. यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्याबाबत पश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

अधिक वाचा - कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवडलेल्या १० शहरात नवी मुंबईचा तिसरा नंबर आला आहे. निवडलेल्या १० शहरांना येत्या १५ डिसेंबर पर्यंत आपले प्रोजेक्ट राज्य सरकारकडे सामील करायचे आहेत. 

यामध्ये महानगरपालिकेच्या महासभेत स्मार्ट सिटीला सभागृहाने पाठिंबा देणारा प्रस्ताव पास करणे गरजेचे आहे. यानुसार आज सभागृहात पशासनाने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आणला असता याला सत्ताधारी राष्ट्रवादीने विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीने स्मार्ट सिटीला विरोध केल्याने विरोध शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.