www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईचं प्रस्तावित विमानतळाचं काम आणखी लांबणीवर पडलयं. भूसंपादन पूर्ण झालं नसल्यानं विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.
नवी मुंबई प्रस्तावित विमानतळासाठी ११६० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी २९१ हेक्टर जमिनीचं संपादन झालेलं नाही. त्यामुळं विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. हे बांधकाम कधी सुरु होईल, याचं निश्चित उत्तरही सरकारकडे नाही. दुसरीकडं या प्रकल्पाची किंमत तीन पटींनी वाढलीय. २००६-२००७ मध्ये या प्रकल्पाची किंमत ४ हजार ७६६ कोटी एव्हढी होती. आता या प्रकल्पाची किंमत १४ हजार ५७३ कोटींवर गेलीय.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जादा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. या विमानतळाच्या बांधकामाचा मुहूर्त अद्यापही सापडलेला नाही.