www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांसाठी नवी लोकल मुंबईत दाखल झालीय. बंबार्डिअर कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चैन्नईच्या ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’त ही नवीन लोकल तयार करण्यात आलीय.
चैन्नईहून निघालेली ही लोकल आता सध्या विरारच्या कारशेडमध्ये उभी करण्यात आली आहे. या नवीन लोकलच्या सर्व प्रकारच्या आता चाचण्या घेण्यात येतील. सर्व चाचणी प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्यात ही लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल.
एमयुटीपी - दोन प्रकल्पाअंतर्गत अशा एकूण ७२ लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यांमुळे येत्या काही महिन्यात पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.