मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला भाजपने जय्यत तयारी केली आहे. जवळपास ५० हजार नागरीक उपस्थित राहतील अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये निमंत्रणावरून जुंपले असून भाजप शक्तिप्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
अधिक वाचा : का रे दुरावा; मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे व्यासपीठावर नसतील?
वांद्रे कुर्ला संकुल इथे एमएमआरडीएच्या मैदानावर होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी भाजपाने कंबर कसली आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलला मेट्रोचे भूमिपूजन झाल्यावर त्याच ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
अधिक वाचा : आदित्य ठाकरे जाणार बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला
या सभेवर वर्चस्व रहाण्यासाठी तसेच छाप पाडण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी सुमारे ५० हजार नागरीक जमतील, अशी भाजपाने व्यवस्था केली आहे. कारण विधानसभा निवडणुकानंतर नरेंद्र मोदी यांची एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिलीच मुंबईत जाहीर सभा आहे. म्हणून या कार्यक्रमावर पक्षाची छाप रहावी यासाठी मुंबईतील सर्व भाजप पदाधिकारी कामाला लागले आहेत.
जास्तीत जास्त भाजप समर्थक कसे सभेला येतील याची तयारी करण्यात आली आहे. यामुळे आंबेडकर स्मारक आणि मेट्रो भूमिपूजन असे दोन्हीही श्रेय स्वत: कड़ेच घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.