www.24taas.com, मुंबई
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज औद्योगिक धोरणाबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राणे यांच्या चांगली शाब्दिक बाचाबाची झाली. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाने नारायण राणे यांचा पारा जबरदस्त चढला. त्यांनी त्या पत्रकाराला तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही असे म्हणून त्याच्या प्रश्नावर आक्षेप चांगलेच दमात घेतले.
औद्योगिक धोरणासंबंधी काही प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले, त्यावर नारायण राणे यांनी आक्षेप घेऊन त्या पत्रकाराशी तावातावाने भांडायला लागले.
सेझ संदर्भात एक वर्ष नेमकं चिंतन काय केलं असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नावर सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी नाराजीचा सूर लावला. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या सूरात सूर मिसळत नारायण राणे यांनी हळू हळू आपली पट्टी काळी सातपर्यंत नेली.
तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही. तुम्हांला आम्ही असे प्रश्न विचारण्यासाठी बोलावले का? असे दमदाटी पत्रकारांना करायला सुरूवात केली. पत्रकारांनीही आपण कोणते प्रश्न विचारावे हे राणे यांनी सांगू नये, असा पवित्रा घेतला. त्यामुळे राणेंच्या पत्रकार परिषदेत बराच वेळ गोंधळाची परिस्थिती होती.