मुंबईतला सर्वात मोठा 'कॉनमॅन' अटकेत

मुंबईमध्ये तरुणींची फसवणूक करणाऱ्य़ा एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल साइट्सद्वारे हा तरुणींना फसवायचा. तरुणींसोबत शारिरीक संबंध बनवायचा आणि त्यानंतर पैसे घेऊन फरार व्हायचा. 

Updated: Jul 21, 2016, 11:18 PM IST
मुंबईतला सर्वात मोठा 'कॉनमॅन' अटकेत title=

मुंबई : मुंबईमध्ये तरुणींची फसवणूक करणाऱ्य़ा एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मॅट्रिमोनियल साइट्सद्वारे हा तरुणींना फसवायचा. तरुणींसोबत शारिरीक संबंध बनवायचा आणि त्यानंतर पैसे घेऊन फरार व्हायचा. 

एका तरुणीने जेव्हा या तरुणाची पोलिसात तक्रार केली तेव्हा पोलिसांना याला पकडलं. जेव्हा पोलीस याला पकडण्यासाठी गेल तेव्हा देखील तो एका तरुणीसोबत होता.

राहुल पाटील असं या तरुणाचं नाव असल्याचं म्हटलं जातंय. या तरुणाने आतापर्यंत ५० तरुणींना फसवलं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लग्नाचं आमिष दाखवून हा त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचा आणि त्याचे पैसे घेवून फरार व्हायचा. याच्यावर मोबाईल चोरी सारखे गुन्हे देखील आहेत.