मुंबईकरांच्या पायाखालची सावली भरदुपारी सरकली

आज शून्य सावली दिवस मुंबईतमध्ये अनुभवता आला. सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने १२.३६ च्या सुमारास सावली गायब झाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2017, 02:43 PM IST
मुंबईकरांच्या पायाखालची सावली भरदुपारी सरकली title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : आज शून्य सावली दिवस मुंबईतमध्ये अनुभवता आला. सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने १२.३६ च्या सुमारास सावली गायब झाली. सूर्याचे भ्रमण, २३  अंशात कलेलेली पृथ्वी यामुळे ही घटना अनुभवता येते. या शून्य सावलीच्या घटनेमुळे अडीच हजार वर्षांपूर्वी पृथ्वी गोल असल्याचा शोध लागला होता.

मुंबईकरांना १५ मे रोजी शून्य सावलीचा दिवस अनुभवता आला, पायाखालची सावलीही नाहिशी होणार आहे. सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायनामधील प्रवासात सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जागा बदलत असल्याने हे घडतं

पायाखाली सावली येऊन ती नाहीशी होण्याचा हा योग सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायन अशा प्रवासातील कर्क आणि मकर वृत्तामधील प्रदेशात जुळून येणार आहे. या संयोगाला 'शून्य सावली' असे म्हटले जातं, वर्षातून दोन वेळा हा योग अनुभवता येतो.

संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या दिवशी ७ ते २० मे या काळात  ही घटना अनुभवता येईल. पृथ्वी प्रदक्षिणेदरम्यान साडेतेवीस अंश कलल्यामुळे सूर्योदयाची आणि अस्ताची क्षितिजावरील जागाही दररोज बदलते आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायनही होते. सूर्याच्या उत्तरायण ते दक्षिणायनमधील प्रवासात सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची जागा बदलत असल्याने हे घडणार आहे.