www.24taas.com, मुंबई
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
आत्तापर्यंत या हिंसाचारप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आलीय. किला कोर्टानं या २३ जणांना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. कोर्टातही पोलिसांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे हिंसाचार करणाऱ्या जमावानं पोलिसांची हत्यारं पळवल्याचंही उघड झालंय. तसंच या जमावानं महिला पोलिसांची छेडछाड केल्याची माहितीही समोर येतीय.
शनिवारी आसाममधल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातील जमाव अचानक हिंसक झाला. त्यांनी सीएसटी परिसरात जाळपोळ केली होती.