मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरणं समोर येतात. आता त्यात आणखी एकाची भर पडलीय. बीएमएमच्या एका विद्यार्थीनीच्या पदवी प्रमाणपत्रात किटे आडनावाचं भाषांतर करून पतंग असं छापण्यात आलंय.
परीक्षा विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे अनेकांनी तोंडात बोट घातली आहेत. याप्रकरणांसह इतर अनेक चुका पदवी प्रमाणपत्रावर झाल्याच्या तक्रारी वाढतायत. या प्रकारणामुळे आता पुन्हा एकदा परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविली जातेय.
निकीता किटे या विद्यार्थिनीनं तिच्या पदवी प्रमाणपत्राचा हा फोटो ट्विटरवर टाकला आहे. निकीतानं तिच्या मैत्रिणीच्या प्रमाणपत्रामध्ये असलेल्या चुकाही फोटो टाकून दाखवल्या आहेत. निकीताची मैत्रिण ठाकूरदेसाईचं आडनाव ठाकूरभाई करण्यात आलं आहे.
@MumbaiUni कन्वोकेशन सर्टिफिकेटमध्ये अक्षम्य चुका. मराठीत लिहिताना चक्क गुगल ट्रान्सलेटरचा वापर केला जातो. Kite चं भाषांतर पतंग असं केलंय.. pic.twitter.com/zWTAwIMFYq
— Nikita Kite (@kite_nik) February 26, 2017
ठाकुर देसाई च ठाकुर भाई काय हे? @kite_nik @madhavidesai10 @MumbaiUni @TawdeVinod pic.twitter.com/V5deAyieAZ
— Nikita Kite (@kite_nik) February 26, 2017