मुंबई पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय

महापालिका प्रभाग क्रमांक १४७ च्या पोट निवडनुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांचा ६६२७ मतांनी विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

Updated: Jan 11, 2016, 03:34 PM IST
मुंबई पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय title=

मुंबई : महापालिका प्रभाग क्रमांक १४७ च्या पोट निवडनुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांचा ६६२७ मतांनी विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राजेंद्र नगराले यांना ४८९० आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नागेश तवटे यांना ४३१७ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालीत. अनिल पाटणकर हे काँग्रेसचे नारायण राणे समर्थक मानले जात होते. मात्र, त्यानी नगरसेवक पदाचा राजीनाम़ा देत शिवसेनेत प्रवेश केला आणि पोट निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेत. 

काँग्रेसकडे असलेली जागा पुन्हा शिवसेनेचा ताब्यातआली असून शिवसेनेचा भगवा झेंडा चेम्बूर घाटला येथे फडकला आहे. पालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पाटणकर यांच्या विजयामुळे भाजपला इशारा दिला गेल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेत  बंडखोरांना थारा नाही, असा संदेशही दिला गेलाय.