www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांना गरम-गरम जेवण देणारे डबेवाले सध्या हालाखीचं जीवन जगत आहेत. सरकारनं या डबेवाल्यांना सिडकोतर्फे भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. घर मिळवण्यासाठी गरज पडल्यास आक्रमक होण्याची तयारीही त्यांनी केल आहे.
‘मॅनेजमेंट गुरू’ अशी ओळख असणारे डब्बेवाल्यांना आपले हक्काचे घरकुल हवे आहे. मुंबईकरांना गरम-गरम जेवण देणारे डबेवाले सध्या हालाखीचं जीवन जगत आहेत. आपलं मुंबईत हक्काचं घर असावं यासाठी त्यांनी आता हालचाली सुरू केल्या असून गरज पडल्यास आक्रमक होण्याची तयारी केली आहे. मुंबईतील हे डबेवाले सध्या डोपडपट्टीत किंवा वेगवेगळ्या मंडळांच्या खोल्यांमध्ये दाटीवाटीनं राहतायत...
मुंबईत सुमारे पाच हजार डब्बेवाले आहेत. सरकारनं या डबेवाल्यांना सिडकोनं भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. गिरणी कामगारांच्या मागे, माथाडी कामगारंच्या मागे त्यांचे नेते सक्षम आहेत म्हणून त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. मात्र मुंबईकरांच्या अन्नदात्यांच्या मागे कोणीच नसल्याची खंत डबेवाल्यांनी बोलून दाखवली आहे.