मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी

मुंबईत पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, मुंबईत मागील २४ तासांत ७५.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Updated: Jun 15, 2015, 11:17 PM IST
मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीची कोंडी title=

मुंबई : मुंबईत पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, मुंबईत मागील २४ तासांत ७५.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

पावसामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली आहे.

ठाणे, मुलुंड, पवईमध्येही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरांतही संततधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरांत ५६.६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दादर वरळी परळ भागातही पावसाने पहाटे पहाटे जोरदार हजेरी लावली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.