झाडाझडतीत पाहा काय आढळलं पोलिसांच्या पोटात!

एरवी सगळ्यांची झाडाझडती आणि तपासणी करणा-या मुंबई पोलिसांचीच तपासणी करण्यात आली. निम्मित होत 'आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं'. ग्लोबल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पोटाची तपासणी करण्यात आली.

Updated: May 29, 2015, 11:11 AM IST
झाडाझडतीत पाहा काय आढळलं पोलिसांच्या पोटात! title=
फाईल फोटो

मुंबई : एरवी सगळ्यांची झाडाझडती आणि तपासणी करणा-या मुंबई पोलिसांचीच तपासणी करण्यात आली. निम्मित होत 'आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं'. ग्लोबल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पोटाची तपासणी करण्यात आली.

मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सदैव तैनात असतात. सततचा बंदोबस्त, उत्सव आणि आंदोलनांमुळं पोलिसांचे कामाचे तास वाढतात. त्यातच वेळी-अवेळी मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते खाणं... यामुळं पोलिसांना पोटाचे विकार जडतात. या सर्वाचं निदान व्हावं यासाठी पोलिसांचीच तपासणी हाती घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं निर्मित्त साधत ग्लोबल आणि जे जे हॉस्पिटलनं तपासणी शिबीय आयोजित केलं होतं.

पोलिसांच्या पोटाच्या तपासणीत अनेकांना आम्लपीत्त, बद्धकोष्टचा त्रास, उच्च रक्त दाबाचा त्रास, उंचीपेक्षा वजन जास्त, वाढलेला पोटाचा घेर, सतत पोट फुगण्याचा त्रास, मानसिक तणाव अशा गोष्टी आढळल्याचं पोटविकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांनी म्हटलंय. 

पोलिसांचं ढासळत चाललेलं आरोग्य आणि वाढलेला ताण पाहता आगामी काळात अशी अनेक शिबिरं आयोजित करण्याचा मानस आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केलाय.   

पोटाचे विकार टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची याचाही सल्ला पोलिसांना देण्यात आला. यामध्ये... 

  • दर चार तासाने आहार घ्यावा

  • शक्यतो शिजवलेले अन्न खावे

  • घाई घाईने खाऊ नये

  • जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी खाणे

  • दही-ताक वगळता दूध, दुधाचे पदार्थ टाळावेत

असे काही साधे-सोपे उपाय सुचवले गेले. 90 टक्के आजार हे पोटाच्या विकाराने होतात, त्यामुळे पोलिसांनीच नव्हे तर इतरांनीही पोटाचं आरोग्य जपलं पाहिजे. अन्यथा पोटाचा कर्करोग, स्वादू पिंडातील सूज, काविळ, पित्तशयाचे खड़े, यांसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं वेळीच सावधान व्हा आणि पोटाळी काळजी घ्या... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.