ढसाळांनी लिहिलेली कविता,<B><font color=#3333cc>'मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे'</font></b>

मुंबई आणि नामदेव ढसाळांचं एक अनोखं नातं होतं. म्हणून नामदेव ढसाळ यांच्या निधनाची बातमी मुंबईकरांच्या जीवाला चटका लावणारी आहे.

Updated: Jan 15, 2014, 12:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई आणि नामदेव ढसाळांचं एक अनोखं नातं होतं. म्हणून नामदेव ढसाळ यांच्या निधनाची बातमी मुंबईकरांच्या जीवाला चटका लावणारी आहे.
`मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे` या कवितेत नामदेव ढसाळ यांनी मुंबईचं अप्रतिम वर्णन केलंय. ढसाळ यांच्या कवितेतल्या ओळीप्रमाणे ढसाळ मुंबईला अखेर खिळवून गेले.
नामदेव ढसाळ यांनी टॅक्सी चालवताना जे पाहिलं-अनुभवलं ते ढसाळांनी कवितेत उतरवलं. नामदेव ढसाळ यांच्या शब्दात त्यांना टॅक्सी चालवतानाच खऱ्या रंगिल्या मुंबईची, इथल्या उघड्या-नागड्या जिनगानीची, तसेच शापित विश्वाची ओळख झाली आणि ती ओळख कवितेच्या रूपाने ढसाळांनी कागदावर उतरवली.
नामदेव ढसाळ म्हणाले होते, कविता लिहितांना जे बघितलं-पाहिलं ते सारं एका फोर्समध्ये बाहेर येऊ लागलं. हा फोर्स असफल ठरलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा होता.
कविता लिहितांना परिस्थितीनुसार पहिल्यांदा नामदेव ढसाळ यांना उध्वस्तपणाची जाणीव झाली, आणि ढसाळांच्या आयुष्याला व्यापून टाकलं. त्यातूनच ढसाळांची कविता जन्माला आली, जिने जातिप्रथेविरुध्द, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द आवाज उठवला.
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे ही नामदेव ढसाळ यांच्या कवितेतली मुंबई आजही तशीच आहे.
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुंदर प्रतिमासृष्टी
अश्विनीरुप ऋतुस्नात कामातूर लक्ष्मी
सर्पस्वरुप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे आदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
4 वेद 18 पुराणं 6 शास्त्र
मी मारतो लंडावर
6 राग 36 रागिण्या मी खेळवतो उरावर
छान, या सुभगवेळी
तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?
स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं
कवी असल्यामुळे मी समजतो पाप

मी तुला खेळवून जाईन
पानंफुलं झिम्माफुगडी खेळतायत
कोकिळा गातायत राजहंस गातायत
खरंच गं, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय
द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली
जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार
अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा
विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलधार
अराजकता, निरर्थकता
सरळ सोप्या प्रतिमांतून रुप घेणारं तुझं लावण्य
सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा
आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग
अप्राप्य प्रेमाच्या गोष्टीअगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू
ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ
नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरुप
तीन वृक्षांच्या तीन तऱ्हा
कालोदयाबरोबरची चकोर वाढ
चंद्रकिरणांचं नृत्य
चंद्रकोरीवरली धूळ चोच मारुन एक चिमणी झटकते आहे
हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला
सहस्त्रमुखांनी
हे सर्व पूर्वसमुद्राला मिळण्यापूर्वी
या नि:शेष साम्राज्यात मला माझ्या
अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे
मी भ्रमणयात्री
या शहरातलं हे हवेचं तळं
तळ्यामधल्या न्हात्याधुत्या पोरी
खडतराची तुळई आणि उशी
गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम
हिर्वा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला दुपारी
जनावरांसारखं रवंथ करणं कदाचित नसावं त्याच्या अंगवळणी
तुझी मर्जी ठेव उजेडावर
उजेड म्हंजे ज्याला मी म्हणतात
नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धीजन्य वारस
आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही
आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही
‘मारा’चा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी
आणि कुणाचीही भिंत चोरुन अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर
कल्पनेचा महारोग
बेंबी / मेंदू / फुफ्फुस यांतून
या सर्व रोगलागणीनंतरही
ही ज्ञानपीठं आनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून
झुलती घरं इच्छांची
ही बैठकीच्या जागेतली शापितं आणि गुपितं
भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि
भाषेचा हातमाग
आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या
चालतो परंतु अंतर कापलं जात नाही
ही खोड जडतरातली
बिछान्याचं पातं