मुंबईत जमीनदोस्त केलेल्या अवैध हुक्का पार्लरचे महापौरांकडून उदघाटन

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आहेत. महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं स्नेहल आंबेकरांनीच पुन्हा उदघाटन केले आहे.

Updated: Nov 10, 2015, 09:47 AM IST
मुंबईत जमीनदोस्त केलेल्या अवैध हुक्का पार्लरचे महापौरांकडून उदघाटन  title=

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात आहेत. महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं स्नेहल आंबेकरांनीच पुन्हा उदघाटन केले आहे.

 महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिकेनं तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचं पुन्हा उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झालाय. डॉकयार्ड येथील उस्तादी हुक्का पार्लरचं गेल्या ६ नोव्हेंबर रोजी महापौर आंबेकर यांनी उद्घाटन केलं. 

अवैध बांधकाम केल्यानं तसंच एफएसआयचं उल्लंघन केल्याप्रकरणी याच हुक्का पार्लरवर महापालिकेनं धडक कारवाई केली होती. त्यावेळी त्याचं नाव अनमोल बँक्वेट असं होतं. मात्र आता उस्तादी हुक्का पार्लर या नावानं तो पुन्हा सुरू झाला असून, महापौरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकारी या पार्लरवर कारवाई करत नसल्याचा आरोप मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.