मदत वेळेवर न पोहचल्याने आग विझवताना जवानाचा मृत्यू

अंधेरीतील लिंक रोड येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला.  

Updated: Jul 18, 2014, 04:52 PM IST
मदत वेळेवर न पोहचल्याने आग विझवताना जवानाचा मृत्यू title=
जवानांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर मागविले होते

मुंबई : अंधेरीतील लिंक रोड येथील लोटस बिझनेस पार्क इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका जवानाचा मृत्यू झाला. वेळेवर शासकीय यंत्रणा पोहोचली नसल्याने ही घटना घडली. दरम्यान, आग पाच तासानंतर आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
 
आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या पथकातील नितीन येवलेकर या जवानाचा मृत्यू झाला. अद्याप सहा जवान इमारतीत अडकले आहेत.

लोटस बिझनेस पार्कच्या इमारतीच्या 21 मजल्यावर भीषण आग लागली. वरच्या मजल्यावरील आग नंतर पसरली. त्यामुळे येथे आग विझविणयासाठी गेलेले अग्निशमन दलाच्या जवानांचे जीवही धोक्यात आले. या जवानापैंकी येवलेकर यांना आपला जीव गमवावा लागला.

ही आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाल्यात तर पाण्याचे आठ टँकरही त्यासाठी येथे आणण्यात आले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.