मुंबई : दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत. तपास यंत्रणांना या घटनेचं दुर्घटनेचं गांभीर्य कळलेलं नाही अशी खरमरीत टीका हायकोर्टानं केली आहे.
देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असल्याचं चित्र निर्माण झाल्याचंही कोर्टानं नमूद केलं. यामुळे सीबीआयच्या विश्वासार्ह्यतेवर प्रश्नचिन्हं निर्माण होतं आहे. पानसरेंच्या हत्याप्रकरणात सारंग आकोलकर आणि विनय पवार 2009पासून फरार आहेत. त्यांच्याविषयी सीबीआय काहीच का बोलत नाही? असा प्रश्नही कोर्टानं विचारला.