मुंबई : मुंबईत होणा-या पी 1 पॉवरबोट रेसिंग सोहळ्याच्या आयोजनावरून मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत.
मुख्यमंत्र्यांना या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचं देणंघेणं आहे की नाही? ग्लोबलायझेशनच्या नुसत्या गप्पा मारू नका, अशा शब्दांत हायकोर्टानं मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलंय. 3 ते 5 मार्च दरम्यान मरीन ड्राइव्हच्या समुद्रात ही स्पर्धा रंगणार असून, त्यासाठी तात्पुरती जेट्टी उभारण्यास कोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. मात्र स्पर्धेनंतर 24 तासात चौपाटी रिकामी करण्याचे निर्देशही आयोजकांना देण्यात आले आहेत.