मुंबई गँगरेप – आरोपींनी सहा महिन्यात केला दोघींवर बलात्कार

मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप केलेल्या आरोपींनी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये याआधी आणखीही दोन महिलांवर गँगरेप केल्याची कबुली दिलीय. तसंच एका प्रेमी युगुलातल्या तरुणीचाही त्यांनी विनयभंग केला होता. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 28, 2013, 09:38 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप केलेल्या आरोपींनी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये याआधी आणखीही दोन महिलांवर गँगरेप केल्याची कबुली दिलीय. तसंच एका प्रेमी युगुलातल्या तरुणीचाही त्यांनी विनयभंग केला होता. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मुंबईत गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कासिम बंगाली, चाँद बाबू शेख, सलीम अन्सारी, सिराज खान आणि विजय जाधव या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढं आलीय. शक्ती मिल कंपाऊंडमध्ये एक कचरा वेचणारी महिला आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवरही बलात्कार केल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं.
दरम्यान, आरोपी सलीमनं महिला फोटोग्राफरवर बलात्कारापूर्वी मोबाईलवर फोन करुन कासिम बंगालीला जेव्हा शक्ती मिल कंपाऊंडमध्ये बोलावून घेतलं. तेव्हा तो इतर आरोपींबरोबर ज्या झोपडीत होता. त्या झोपडीतल्या एका त्यांच्या साथीदाराला या गुन्हातल्या साक्षीदार बनवणार असल्याची माहिती मिळतेय.
मंगळवारी दिल्ली आणि गुजरातहून आलेल्या फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाची तब्बल तीन तास पाहणी केली आणि पुरावे गोळा केले. शिवाय फॉरेन्सिक टीमनं आरोपींच्या घराचीही पाहणी करून, काही वस्तू आणि कपडे हस्तगत केले.

गुजरात फॉरेन्सिक टीमच्या पथकात दोन मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश आहे. या मानसोपचारतज्ज्ञांनी आरोपींची ‘लेअर्ड व्हाईस अॅनॅलिसिस’ म्हणजेच ‘एलव्हीए’ चाचणी केली. या तपासणीत आरोपीच्या आवाजाच्या भावना आणि खोलीवरुन तो किती खरं बोलतोय हे तपासलं जातं. तर आरोपींमधला चाँद बाबू शेख हा आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळं त्याच्या वयाचं निदान करण्यासाठी त्याची ‘ऑसिफिकेशन टेस्ट` केली जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.