'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात!

मुंबई नगरीची शान आणि मुंबईतील एक अत्यंत महत्वाच रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी आज निळाशार रंगात रंगून गेलंय... त्याला कारणही तसं खासचं आहे.

Updated: Oct 25, 2015, 02:52 PM IST
'सीएसटी' रंगलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या रंगात! title=

मुंबई : मुंबई नगरीची शान आणि मुंबईतील एक अत्यंत महत्वाच रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी आज निळाशार रंगात रंगून गेलंय... त्याला कारणही तसं खासचं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि संयुक्त राष्ट्रसंघ हा निळ्या रंगाने ओळखला जातो म्हणूनच... जगातील साठ देशातील २०० हून अधिक महत्वाच्या वास्तूंना निळ्या लाईटसचा साज चढवण्यात आला आहे. 

इजिप्तमधील पिरामिड्सपासून ते लंडनच्या आयफेल टॉवर, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींग अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंवर निळ्या रंगाचा प्रकाझोत सोडण्यात आलाय. 

२४ ऑक्टोबर १९४५ रोजी मानवतेच्या उत्थनासाठी आणि शांततेसाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. गेली ७० दशकं मानवाच्या शांततामय प्रगतीसाठी नेहमीच कार्यरत राहिली मात्र अजूनही स्त्रिया, बालकांसाठी आणि गरीबी, रोगराई अशा गोष्टींबाबत अनेक देशांमध्ये प्रगती होणं बाकी आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु राहतील असं संयुक्त राष्ट्रसंघ सचिवांनी सांगितलं.

...आणि याच प्रगतीचे साक्षिदार होण्यासाठी मुंबईतील सीएसटीची इमारतही या निळाईमध्ये न्हायली आहे. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.