नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Updated: Nov 20, 2016, 10:07 PM IST
नोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला  title=

मुंबई : नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे आम्ही त्रस्त आहोत त्यामुळे व्हॅट आणि इनकम टॅक्समध्ये सवलत मिळावी अशी मागणी मुंबईतल्या या व्यापाऱ्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची भूमिका पुढे न्यावी यासाठी हे व्यापारी मातोश्रीवर गेले होते. मोदींना सत्तेवर आणण्यासाठी आम्हीच मदद केली होती आणि आता आम्हलाच त्रास दिला जातोय असंही हे व्यापारी म्हणाले आहेत.