मुंबई बॉम्बस्फोटातील १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा

२००२-२००३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज विशेष पोटा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेय. तर यातील एकाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेय.

Updated: Apr 6, 2016, 02:21 PM IST
मुंबई बॉम्बस्फोटातील १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा title=

मुंबई : २००२-२००३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज विशेष पोटा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेय. तर यातील एकाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेय.

सरकारी वकील रोहिणी सैलियन यांनी आरोपींनी कठोर शिक्षा करण्याची मागणी कोर्टात केली होती. पण मुझ्झमील अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आलीय. त्याचप्रमाणे साकीब नाचन १० वर्ष सक्त मजुरी आणि १ लाख रुपये दंड सुनावण्यात आलाय.

२००२-२००३ स्फोटाचा मास्टरमाईंड साकीब नाचनसह १० आरोपींना गेल्या आठवड्यात पोटा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. तर ३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. तर, १० दोषींपैकी मुझम्मील अन्सारीला याला बॉम्ब ठेवण्यासह विविध अशा सर्व १८ गुन्ह्यांमध्ये पोटा न्यायालयाने दोषी ठरवलं. 

रेल्वे बॉम्बस्फोट

- अन्वर अली, मोहम्मद कमील, नूर मोहम्मद यांना २ वर्षांचा तुरूंगवास
- सिमीचे दहशतवादी साकीब नाचन, आतिफ मुल्ला यांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
- प्रमुख दोषी मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत आणि वाहीद अन्सारी यांना जन्मठेप