उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 6, 2013, 12:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छटपूजेला जोरदार विरोध केला होता. शिवसेनेनंही परप्रांतियांच्या ताकद दाखवण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर मुंबई भाजपचे तत्कालीन अध्यक्ष गोपाळ शेट्टी तसंच राज पुरोहित यांनी आपापल्या कारकिर्दीत छटपूजेच्या वाटेला गेले नाहीत.
पण आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आणि मुंबईतील मोठी उत्तर भारतीय व्होट बँक लक्षात घेता आशीष शेलार यांनी मुंबईभर आणि त्यातही विशेषत: उत्तर भारतीय अधिक संख्येनं असणाऱ्या मतदारसंघात जागोजागी छटपूजेसाठी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.