मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानं अधिसूचना जारी करून क्लस्टर पुनर्विकासाला मंजुरी दिलीय.

Updated: Sep 10, 2014, 10:00 AM IST
मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा  title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानं अधिसूचना जारी करून क्लस्टर पुनर्विकासाला मंजुरी दिलीय.

यासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन राहून, क्लस्टर विकासाला हिरवा कंदिल दाखवण्यात आलाय.. त्यामुळं मुंबईतील 30 वर्षांपेक्षा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.

2000 पूर्वीच्या झोपड्यांचाही त्यात समावेश असून, ठाण्यामध्ये एसआरए योजनेअंतर्गत विकास घडवला जाणार आहे. क्लस्टर योजनेमुळे येत्या 5 वर्षांत म्हाडाकडून 40 हजार घरे बांधण्यात येतील, असंही सरकारनं स्पष्ट केलंय. क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा झाल्यानं जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.