परिस्थितीनं पिचलेल्या रिक्षावाल्याची 'गिटार'भक्ती, व्हिडिओ व्हायरल

एखाद्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातात गिटार पाहायला मिळाली तर... तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल ना... पण, हे एक ब्लॉगर कुंज कारिया याच्यासोबत खरोखर घडलं.

Updated: Jul 24, 2015, 04:56 PM IST
परिस्थितीनं पिचलेल्या रिक्षावाल्याची 'गिटार'भक्ती,  व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : एखाद्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातात गिटार पाहायला मिळाली तर... तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल ना... पण, हे एक ब्लॉगर कुंज कारिया याच्यासोबत खरोखर घडलं.

कुंज स्वत: गिटार वाजवणं शिकतोय. एकदा गिटारसह रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षावाल्यानं कुंजशी सहज संवाद साधला. पाच मिनिटांच्या संभाषणातच या रिक्षावाल्याला गिटारचं चांगलच ज्ञान असल्याचं समजलं.  
 
जवळपास 10 वर्षांपूर्वी हाच रिक्षा ड्रायव्हर प्रोफेशनल गिटारिस्ट म्हणून काम करत असल्याचं कुंजला समजलं. आपल्या ग्रुपसोबत हा रिक्षा ड्रायव्हर छोट्या मोठ्या रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये किंवा कधीकधी रस्त्यावरही गिटार वाजवण्याचं काम करत होता. पण, उपजिविकेपुरतेही पैसे हाती पडत नव्हते. लग्न झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न होताच... त्यामुळे मग त्यानं रिक्षा चालवण्याचं काम हाती घेतलं. 

पण, कुंजच्या हातातली गिटार काही त्याला स्वस्थ बसू देईना... त्यानं थोड्यावेळासाठी काहीतरी वाजवून पाहू का? अशी विचारणा कुंजकडे केली... आणि कुंजनंही मोठ्या उत्सुकतेनं आपली गिटार त्याच्या हाती दिली. 

कुंजनं हा सगळा किस्सा एका ब्लॉगद्वारे कथन केलाय... आणि रिक्षावाल्याचा व्हिडिओही... काही दिवसांतच हा व्हिडिओ व्हायरल गेलाय. 

तुम्हीही पाहा...

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.