मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आठवडा अडचणीचा

विमान प्रवास करणा-यांसाठी आगामी आठवडा अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विमानतळाचा रनवे कामासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार तासांसाठी बंद असणार आहे. 

Updated: Oct 19, 2016, 09:58 AM IST
मुंबईतून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आठवडा अडचणीचा title=

मुंबई : विमान प्रवास करणा-यांसाठी आगामी आठवडा अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुंबई विमानतळाचा रनवे कामासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार तासांसाठी बंद असणार आहे. 

याचा परिणाम तब्बल एकवीसशे उड्डाणांवर होणार असल्याचा अंदाज आहे. मुख्य रनवे बंद असताना पर्यायी रनवेचा वापर करण्यात येईल.

याशिवाय 31 ऑक्टोबर आणि 3,7,10,14,17,21,24 आणि 28 नोव्हेबरला रनवे पूर्णतः बंद असणार आहे. मुंबई विमानतळाच्या अधिका-यांनी याबाबत सर्व विमानसेवांना माहिती दिलीय. तसच या दरम्यान विमानांच्या वेळेतही बदल करण्यात आलाय.