एअर इंडियात 'उंदीर मामा'ही प्रवासी

विमानात उंदीर असल्याची सूचना मिळाल्यानंतरही धोका पत्करून विमान उडवण्यात आलं. पायलटने विमानात उंदीर असल्याची सूचना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती.

Updated: Aug 25, 2014, 08:27 PM IST
एअर इंडियात 'उंदीर मामा'ही प्रवासी title=

मुंबई : विमानात उंदीर असल्याची सूचना मिळाल्यानंतरही धोका पत्करून विमान उडवण्यात आलं. पायलटने विमानात उंदीर असल्याची सूचना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली होती.

एअर इंडियाचं हे विमान लंडनहून दिल्लीला येत होतं. पायलट आणि एटीसी यांच्यात गोपनीय चर्चा झाली, पायलटने याबाबतीत एटीसीला सूचनाही दिली. मात्र पायलटला उड्डाण सुरूच ठेवण्याची सूचना देण्यात आली. 

ही गोपनीय चर्चेची टेप आता लीक झाली आहे. एटीसी आणि पायलटमध्ये 20 ऑगस्ट रोजी झालेली ही चर्चा आहे. प्रवासानंतर उंदीर बाहेर काढण्यात येईल आणि अडचण दूर करण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं.

या आधी 7 ऑगस्ट रोजी फ्लाईटमध्ये उंदीर आल्यानंतर एअर इंडियाचं विमान तात्काळ लँडिंग करण्यात आलं आणि सफाईसाठी पाठवण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.