वरळी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा, लहानग्यांचाही समावेश

मुंबईतल्या वरळी भागात सुरू असलेला बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी बंद पाडला. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेल्याची घटना घडलीय. 

Updated: May 14, 2017, 12:04 AM IST
वरळी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा, लहानग्यांचाही समावेश title=

मुंबई : मुंबईतल्या वरळी भागात सुरू असलेला बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी बंद पाडला. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेल्याची घटना घडलीय. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरळीच्या बीएमसी चाळीत शनिवार - रविवारची सुट्टी गाठून बौद्ध पौर्णिमेनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यावेळी इथं डीजेही सुरू होता... जिथे हा कार्यक्रम सुरू होता तिथे जवळच पोलीस स्टेशन आहे. 

रात्र 9 वाजल्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक इथे येऊन नागरिकांना कार्यक्रम बंद करायला भाग पाडलं. त्यामुळे चिडलेले नागरिक मोठ्या संख्येनं वरळी पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले... पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत त्यांनी आपला निषेध नोंदवला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.