मान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल

मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Updated: May 29, 2015, 03:47 PM IST
मान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल title=

मुंबई : मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दक्षिण श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मॉन्सूनची उत्तरेकडे वाटचाल झाली असून, त्याने आत्तापर्यंत अरबी समुद्राचा दक्षिण भाग, मालदीव-कॉमोरीनचा प्रदेश, श्रीलंका आणि नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. मोसमी वारे शनिवारपर्यंत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

विदर्भात सोमवारपर्यंत 1 जून उष्णतेची लाट कायम राहील; तर शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यापासून होरपळून निघालेल्या विदर्भात गुरुवारीही तीव्र चटके जाणवत होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.