पहिल्याच दिवशी मोनोरेल उशीरा उठली

मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.

Updated: Feb 2, 2014, 01:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.
कधी काळी ट्राम धावत असलेल्या मुंबईत ट्राम इतिहास जमा झाल्यानंतर, मोनोरेलसारखी सेवा मुंबईकरांना मिळाली आहे.
मुंबईकरांनी चेंबूर स्टेशनवर मोनोरेल पाहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
पंधरा मिनिटांच्या अवकाशानं ही मोनोरेल धावते. मुंबईकच्या वाहतूक व्यवस्थेला थोडासा का होईना, दिलासा मोनोरेलकडून मिळणार आहे.
सुरूवातीला वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यात ही मोनोरेल सुरू आहे. प्रवाशांना पान आणि गुटखा तसेच तंबाखूच्या पिचकाऱ्या मारून मुंबईच्या मोनोला बंबय्या करून टाकू नये, अशी अपेक्षा सर्व मुंबईकरांकडून केली जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.