मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ राहाण्याचा निर्णय़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलाय...
मनसेचा या निवडणुकीत कोणालाही पाठिंबा असणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केलीय. राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. पण त्याचबरोबर राज यांच्या भूमिकेबाबत आश्चर्यही व्यक्त केलं जातंय.
या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पर्यावरणमंत्री रामदास कदम, कॉँग्रेसचे भाई जगताप, भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोज कोटक आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड रिंगणात आहेत. दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीची चुरस वाढलीय.
उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या किती उमेदवार उमेदवारी कायम ठेवतात याकडे लक्ष राहाणार आहे. पहिल्या आणि दुस-या पसंतीच्या मताचा कोटाही आता मनसेच्या तटस्थ राहाण्याच्या भूमिकेमुळे बदलणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.