गॅस दरवाढीला विरोध मनसेचा विरोध, काढला मोर्चा

गॅस दरवाढीला विरोध करत आणि गॅसच्या सबसिडीसाठी आधार कार्डची सक्ती रद्द करावी, या मागण्यांसाठी मनसेनं मुंबईतील तहसिलदार कार्यालयांवर मोर्चा काढला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2014, 08:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गॅस दरवाढीला विरोध करत आणि गॅसच्या सबसिडीसाठी आधार कार्डची सक्ती रद्द करावी, या मागण्यांसाठी मनसेनं मुंबईतील तहसिलदार कार्यालयांवर मोर्चा काढला.
अंधेरी आणि बोरीवली येथील तहसिलदार कार्यालयांवर काढण्यात आलेल्या मोर्च्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येत्या आठवड्यात गॅसदर वाढ कमी केली नाही आणि आधार कार्डची सक्ती रद्द केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पक्षनेत्यांनी दिला. यावेळी पक्षाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ