राज ठाकरे किंवा गीता गवळी ठरू शकतात किंगमेकर

 सध्या राज्यात सर्वत्र मुंबईत कोणाचा महापौर होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. या संदर्भात विविध समिकरणं मांडली जात आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 28, 2017, 07:06 PM IST
राज ठाकरे किंवा गीता गवळी ठरू शकतात किंगमेकर  title=

मुंबई :  सध्या राज्यात सर्वत्र मुंबईत कोणाचा महापौर होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. या संदर्भात विविध समिकरणं मांडली जात आहे. 

कशी असतील मुंबई महापालिकेतील सत्तेची समीकरणे 

जर काँग्रेस ३१ + राष्ट्रवादी ९+ सपा ६+एमआयएम २ यांनी स्वतंत्र गट स्थापन करून महापौर पदाचा उमेदवार उभा केल्यास किंवा तटस्थ राहिल्यास पुढील शक्यता आहेत. यावेळी मनसे आणि अभासे किंगमेकर ठरू शकते.

१.शिवसेना ८४+ अपक्ष ४ + अभासे १ = ८९ 
भाजप ८२+ अपक्ष १ = ८३ 
मनसे तटस्थ राहिल्यास
सेनेचा महापौर होईल

२. शिवसेना ८४+अपक्ष ४= ८८
 भाजप ८२+मनसे ७+ अपक्ष १+ अभासे १= ९१
भाजपचा महापौर होईल

३. शिवसेना ८४+मनसे ७+ अपक्ष ४+ अभासे १ = ९६
भाजप ८२ + अपक्ष १= ८३
सेनेचा महापौर होईल.