पोलिस दलात राजकीय हस्तक्षेप कमी करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Updated: Nov 19, 2014, 06:45 PM IST
पोलिस दलात राजकीय हस्तक्षेप कमी करणार : मुख्यमंत्री title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

मुख्यमंत्री म्हणाले, 'पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार नाही. पोलिसांचे आधुनिकीकरण व सक्षमीकरणावर भर देणार आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातील गैरवापरावरही नियंत्रण मिळवणार आहे.' 

दरम्यान, पोलिस यंत्रणेच्या सक्षमीकरणाबरोबरच पोलिस महासंचालकांचे अधिकार वाढवण्याचा निर्णयही जाहीर केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.