अर्जावर सेल्फी लावणाऱ्या २ हजार जणांना म्हाडाचा दणका

सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या असतानाच, दुसरीकडे म्हाडाच्या फॉर्मसाठी देखील सेल्फी फोटोंचा वापर झाल्यानं अनेकांचे फॉर्म म्हाडाने बाद केले आहेत. 

Updated: Feb 2, 2016, 07:31 PM IST
अर्जावर सेल्फी लावणाऱ्या २ हजार जणांना म्हाडाचा दणका  title=

 मुंबई : सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या असतानाच, दुसरीकडे म्हाडाच्या फॉर्मसाठी देखील सेल्फी फोटोंचा वापर झाल्यानं अनेकांचे फॉर्म म्हाडाने बाद केले आहेत. 

म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या चार हजार 275 घरांसाठी केलेल्या अर्जावर स्वत:चा सुस्पष्ट असा फोटो लावण्याऐवजी जवळपास दोन हजार 392 नोंदणी धारकांनी चक्क सेल्फी फोटो लावले आहेत.त्यामुळे त्यांचे अर्ज म्हाडाने बाद केलेत.