मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Mar 26, 2017, 08:37 AM IST
मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक  title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर मेन लाइनच्या ठाणे ते माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावर दुरुस्तीचं काम असल्याने मेगाब्लॉक असेल. त्यामुळं 11.20 ते 4.20 या काळात या मार्गावरील अप स्लो मार्गावरील वाहतूक अप फास्ट मार्गावरुन चालवण्यात येईल. 

हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी या मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर या मार्गादरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दु. 2 या काळात जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.