मुंबई : देशभरातील औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत. मात्र, चर्चा सुरु असताना बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिलाय.
अधिक वाचा : औषधे आजच खरेदी करा, देशव्यापी संपाची हाक
दरम्यान, परिस्थिती हाताळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं पावलं उचलली आहेत. जर रुग्णांना औषधं मिळाली नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कडक इशारा दिलाय. चौकशी सुरु असताना औषधाची दुकाने बंद ठेवणे चुकीचे आहे, असे बापट म्हणालेत.
सुरक्षेच्या कारणास्तव औषध विक्रेत्यांनी ऑनलाईला विक्रीला हरकत घेतली असली तरी ८० हजार कोटी रुपयांच्या औषध विक्रीच्या बाजारपेठेत गेल्या दोन वर्षात ऑनलाईन विक्रेत्यांचा सहभाग वाढल्याची चिंता विक्रेत्यांना आहे. त्यामुळे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं जाहीर केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.