www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या साखर कारखान्यांमध्ये १० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
सहकाराची चळवळ संपवण्याकडेच सरकारची वाटचाल सुरू असून साखर उद्योगच सरकारनं विकायला काढला असल्याची टीका पाटकरांनी केलीय. तब्बल ४० कारखाने कवडीमोल भावानं विकून नेत्यांच्याच पदरात टाकण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलंय. सत्ताधारी आणि आघाडीच्या नेत्यांनी मिळून गैरव्यवहार केल्याचा आरोपही मेधा पाटकर यांनी केलाय. अजित पवार, छगन भुजबळ. फौजिय़ा खान, जयंत पाटील अशा अनेकांनी कारखान्यांची खरेदी केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केलाय.
सरकारच्या धोरणांविरोधात उद्या आझाद मैदानावर मेधा पाटकर आणि अण्णा हजाजेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही सरकारनं धोरण बदललं नाही तर आंदोलन आणखीनच तीव्र करणार असल्याचा इशारा मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.