मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि कोकण या भागात पावसाची शक्यता आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे, असा अंदाज खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात चेन्नई आणि पाँडीचेरी दरम्यान वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच लक्षद्वीप लगतच्या समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात मुंबईसह शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच औरंगाबाद, बीड, लातूर या ठिकाणीही संध्याकाळच्या वेळी पाऊस झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.