मुंबई : 'कोसला'कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी साहित्यातील अमुल्य योगदानाबद्दल भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
भालचंद्र नेमाडे यांना पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
डॉ. नामवर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय घेतला.
भालचंद्र नेमाडे यांची पहिली कोसला ही कादंबरी प्रचंड गाजली. 'कोसला'च्या लिखाणामुळे मराठी साहित्यात लिखाणाची एक नवी परंपरा निर्माण झाली.
अनेक युवक नेमाडेंच्या लिखाणाचे चाहते झाले, त्यांना नेमाडपंथी असंही म्हटलं जाऊ लागलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.