सर्व विरोधकांची एक आघाडी शक्य?

देशात तिस-या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं सांगितलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 12, 2013, 10:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात तिस-या आघाडीच्या सरकारची चर्चा रंगली असताना शिवसेना नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी सर्व विरोधकांची एक आघाडी करणं कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं सांगितलंय.
मात्र हे घडवून आणण्यासाठी एका कर्तबगार नेत्यानं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे नेमका हा कर्तबगार नेता कोण याची चर्चा रंगू लागलीय़. जोशींचा रोख नेमका कुणाकडे आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही...मात्र हा नेता जोशींच्या वक्तव्याला प्रतिसाद देणार का याकडे लक्ष लागलंय.
राज ठाकरे यांच्या टाळीवरून अनेक वाद विवाद झाल्यावर आता मनोहर जोशींनी कर्तबराग नेता म्हणत मनसेला आवाहन केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची साथ सोडून विरोधक म्हणून काम केल्यास महायुती बळकट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचा उल्लेख कर्तबगार नेता केला असण्याची शक्यता असू शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.