मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह

दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय. 

Updated: Dec 16, 2015, 10:38 AM IST
मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह title=

मुंबई : दोन दिवसांपूर्वी कांदीवलीच्या नाल्यात दोन मृतदेह मिळाल्याची घटना ताजी असतानाच मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात एका महिलेचा मृतदेह सापडलाय. 

दोन बॅगांमध्ये तुकडे केलेल्या अवस्थेत हा मृतदेह भरून ठेवण्यात आला होता. बॅगेत दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. 

तर दुस-या बॅगमध्ये कपडे होते. नाल्याच्या बाजूला बांधकाम सुरू होतं. तिथल्या सुरक्षा रक्षकाला ही बॅग आढळून आली.