महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम

15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.

Updated: Aug 17, 2014, 12:37 PM IST
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम title=

मुंबई : 15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.

भाजपाचा 15 ते 20 जागा अतिरिक्त मिळाव्या यासाठी आग्रही आहे. त्यावर शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातचं आरपीआय आठवले गट, जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्षाने एकुण 130 पेक्षा जास्त जागांची यादी सेना - भाजप पुढे ठेवली आहे. त्यामुळे या छोट्या घटक पक्षांची समजूत घालतांना सेना - भाजपला चांगलाच घाम फुटणार आहे.

जागा वाटपाचा निर्णय लवकर घ्या - आठवले
शिवसेना भाजपच्या जागावाटपचा प्रश्न सुटल्याशिवाय आरपीआय आणि मित्रपक्षांना जागावाटप होणार नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा जागावाटपाचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.