लवकरच एस.टी.मध्ये वायफाय सुविधा!

राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस.टी.च्या बस गाडय़ांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या एसटीने नुकतंच ६८व्या वर्षात पदार्पण केलेल्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येणार आहे.

Updated: Jun 4, 2015, 08:35 PM IST
लवकरच एस.टी.मध्ये  वायफाय सुविधा! title=

मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस.टी.च्या बस गाडय़ांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या एसटीने नुकतंच ६८व्या वर्षात पदार्पण केलेल्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येणार आहे.

मात्र पहिल्या टप्प्यात पन्नास गाड्यांमध्ये मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा दिली जाणार आहे, यानंतर एस.टी.च्या १७ हजार बसेसमध्ये मोफत वायफाय सुरू केले जाणार आहे. एस.टी.मध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात वायफाय पोहोचणार आहे.

कालांतराने एस.टी.च्या साध्या, निमआराम आणि शिवनेरी अशा सुमारे सतरा हजार बसेसमध्ये वायफाय मोडेम बसवण्यात येणार आहेत. ही सेवा तीन टप्प्यात सुरू होणार असून, आगामी सहा महिन्यांत बहुतेक सर्व एस.टी. गाड्यात वायफाय सुरू केले जाणार आहे. 

एस.टी.च्या लाल डब्यातील प्रवाशांना वायफाय सुविधा मोफत पुरवण्याच्या निर्णयामुळे रोडावलेल्या प्रवासी संख्येबाबत काही अंशी दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

एस.टी.च्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने महामंडळाच्या तोटय़ामध्ये दरवर्षी वाढ होते. त्यामुळे खासगीच्या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने वायफाय सुविधा देण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.